Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

प्राण्यांच्या अंतर्गत अवयवाचे मांस व गोवंशीय कातड्यांची वाहतूक करणार्‍यांवर कारवाई


दि. 23 आँगस्ट 2023 रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट ते सोलापुर महामार्गावर कुंभारी गावाच्या हददीत गंगाप्रसाद पेट्रोल पंपासमोर आरोपी मुजमिल अब्दुल सत्तार सयद (वय 21 वर्षे),रा.नदाफ गल्ली,मिरज,जि.सांगली,गौस अमीन कुरेशी (वय 22 वर्षे),रा.झोपडपटटी,वळसंग,ता.दक्षिण सोलापुर यांनी त्यांच्या ताब्यातील पिकअप गाडी त्याचा क्र.एम.एच.45 टी. 2150 मधुन प्राण्यांच्या अंतर्गत अवयवाचे मांस व गोवंशीय कातडे असा माल रेहमान बेपारी रा.इंडी (राज्य कर्नाटक) यांच्याकडुन विना परवाना जनावरांची कत्तल करून तो सर्फराज रा.विजापुर वेस,सोलापूर यांच्याकडे वाहतुक करुन घेवुन जात असताना मिळुन आले आहेत.5 लाख रुपये किंमतीची एक पांढ-या रंगाची महिंद्रा मॅक्स पिक अप गाडी,2 लाख 50 हजार रुपये किंमतीचे प्राण्याचे अंतर्गत अवयवाचे मांस,30 हजार 800 रुपये किंमतीचे गोवंशीय कातडे असा एकुण 7 लाख 55 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


म्हणून सदर आरोपीं विरुद्ध भा.द.वि.सं.कलम 429,34,महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि. 1976 व सुधारित अधिनियम 1995 चे कलम 5 (क) 2 (अ), प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधि.1960 चे कलम 38 (3),मो.वा.का.क. 83/177 प्रमाणे वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पीएसआय उस्मान हे करीत असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments