Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

औज अपघातातील 4 मृतांच्या नातेवाईकांना जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते 10 लाखांची मदत

दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज गावातील प्राथमिक शाळेच्या कंपाउंडवर चेट्टीनाड कंपनीचे सिमेंटचा बलकर उलटल्याने झालेल्या अपघातामध्ये मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना मुख्यमंत्रीसहायता निधीतून प्राप्त प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसाह्य तसेच कंपनीकडून प्रत्येकी पाच लाख रुपये अशी एकूण दहा लाख रुपयांचे धनादेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे वितरित करण्यात आले.तसेच जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये भरपाई देण्यात आली.


दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी साडेबारा वाजता होटगी रोडवर औज पोस्ट आहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथे सिमेंट कारखान्याचा बलकर अंगणवाडी शाळेच्या कंपाउंडवर पलटी झाला.या दुर्घटनेमध्ये विठ्ठल कोंडीबा शिंगाडे,शशिकांत इंगळे,अनिल नामदेव चौधरी तसेच प्रज्ञा बसवराज दोडतले या विद्यार्थ्यांनीसह एकूण चार व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या.


या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे,सोलापूर उपविभाग क्रमांक 2 चे उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय गावडे,दक्षिणचे तहसिलदार किरण जमदाडे,पोलीस अधिकारी,चेट्टीनाड कंपनीचे तसेच वाहतूक कंपनीचे प्रतिनिधी,सरपंच,औज गावातील नागरिक उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments