Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख आणि जखमींना ५० हजार मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश

दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी गावाजवळ असलेल्या औज गावा जवळ शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सिमेंटचा बल्कर पलटी झाला आहे. एका शाळेजवळ असलेल्या बस स्टॉप समोर अपघात झाला आहे.



सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील मोठा फौजफाटा या ठिकाणी आला असून पलटी झालेल्या बल्करला बाजूला करण्यात आले आहे. चेंगरून प्रज्ञा बसवराज दोडतले (इयत्ता ३री,रा औज), विठ्ठल शिंगाडे (वय ७० वर्ष,रा औज ता दक्षिण सोलापूर),महेश इंगळे (वय वर्षे 10),अनिल चौधरी असे चौघांची नांवे आहेत.अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव,वळसंग पोलीस ठाण्याचे एपीआय सनगले,अतुल भोसले,आरटीओ अधिकारी गवारे हे आपल्या फौजफाट्यासह दाखल झाले आहेत.


मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख आणि जखमींना ५० हजार देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments