Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

राँग साईडने आला आणि घात झाला

दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडीमार्गे येणार्‍या होटगी स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलावर राँग साईडने आलेल्या भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारास धडक दिली.यात दुचाकीस्वाराच्या पायाला दुखापत झाली आहे.सिद्धाराम निंगप्पा कोळी (वय वर्षे ३९,रा.होटगी स्टेशन,ता.द.सोलापूर) यांनी वळसंग पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार,गणेश दत्तात्रय पवार (वय वर्षे २९,रा.सोलापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान,१७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता फिर्यादी हा जेवणाचा डबा आणण्याकरिता मित्र सोहेल याची मोटारसायकल त्याचा क्रमांक एमएच १३ सीडी ०३१६ घेऊन फताटेवाडीमार्गे होटगी स्टेशनकडे जात असताना चन्नवीर प्रशालेजवळील ब्रिजवर समोरून राँग साईडने येत असलेली मोटारसायकल एमएच १३ बीपी ०४७१ चा चालक गणेश पवार याने जोराची धडक दिली.यात फिर्यादीच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.उपचार घेतल्याने उशीरा फिर्याद देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments