Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

गोवंशीय प्राण्यांच्या विविध अवयवांची वाहतूक करणार्‍यांवर पोलीसांची कारवाई


दि. 17 सप्टेबर 2023 रोजी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी विडी घरकुल येथे क्रांती चौक ते अमन चौक जाणार्‍या रोडवर पिंटू पानटपरीच्या समोरील रोडवर आरोपी आरीफ अश्रफ सय्यद (वय 30 वर्ष),रा.शिवगंगा नगर,नई जिंदगी,सोलापूर 2 )महमंद हुसेन महमद हनिफ कुरेषी (वय 52 वर्ष),रा.बेगमपेठ,सोलापूर यांनी त्यांच्या ताब्यातील अशोक लेलॅण्ड दोस्त चारचाकी गाडी तिचा क्रमांक एम.एच. 13 सी.यु.9182 मधुन गोवंशीय प्राण्यांची बेकायदेशीर/विनापरवाना कत्तल करून त्याचे पायाचे,मुंडक्याचे,विविध अवयवांचे हाडे विनापरवाना वाहतूक करीत असताना मिळून आले आहेत.म्हणून दोन्ही आरोपीं विरुध्द भारतीय दंड विधान कलम 429,34 महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5,5-क,9 व 9-अ प्रमाणे वळसंग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पीएसआय शेख हे करीत असल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments