Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

गंगेवाडी ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच आणि सदस्यांनी शासकीय जागेत केले अतिक्रमण

दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्या बाबतची तक्रार समाजसेवक अर्जून झुंबर जाधव यांनी महसूल प्रशासनाकडे केली होती.महसूल विभागातील तहसिलदार यांनी सदरचा तक्रार अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वर्ग केला.याप्रकरणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,सोलापूर यांनी सदर प्रकरणाची नियमानुसार सखोल चौकशी करून शासन निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही करण्याबाबत पंचायत समिती,दक्षिण सोलापूरचे विस्तार अधिकारी आर.एम. कमळे यांना दिलेले आहे.चौकशी अहवाल प्राप्त झाल्या नंतर या प्रकरणी नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे समाजसेवक अर्जून जाधव यांना पत्राद्वारे कळवण्यात आल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


मागील पंचवार्षिक कालावधीतील सरपंच आणि उपसरपंच यांनी देखील येथील शासकीय जागेत अतिक्रमण केल्या बाबतची तक्रार समाजसेवक जाधव यांनी प्रशासनाकडे केली होती.त्यासंबंधीची कारवाई अद्यापही झालेली नाही.गंगेवाडीचे माजी सरपंच आणि उपसरपंच यांची पदे गेली मात्र अतिक्रमण कायमच राहिलेली आहेत.त्यामुळे प्रशासन या अतिक्रमणाकडे तात्काळ लक्ष देऊन कारवाई करेल का? केवळ कागदी घोडे नाचविण्यातच रस दाखवेल? असा सवाल गंगेवाडी ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments