Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

खर्च सादर न केल्याने भंडारकवठे ग्रामपंचायतीच्या सरपंचासह जणांचे सदस्यत्व रद्द



ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालेला खर्च सादर न केल्याने भंडारकवठे ग्रामपंचायतीचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांच्यासह ६ सदस्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रद्द केले आहे.यामुळे त्यांना पुढील ५ वर्षे निवडणूक लढविता येणार नाही.सदस्यत्व रद्द झालेले सर्व ६ जण हे आमदार सुभाष देशमुख समर्थक आहेत.यामुळे आमदार सुभाष देशमुख व भाजपला मोठा धक्का बसला आहे.


सरपंच भीमाशंकर कल्लाप्पा बबलेश्वर,सदस्य स्मिता अशोक मुक्काणे,सोमनिंग धरेप्पा कमळे,संगप्पा काशीराम बिराजदार,युक्ता यतीन शहा,राजश्री उमेश जंगलगी (सर्वजण राहणार भंडारकवठे,तालुका दक्षिण सोलापूर) असे सदस्यत्व रद्द झालेल्या ६ जणांची नावे आहेत.या प्रकरणात अर्जदार सिद्धेश्वर महादेव कुगणे यांनी ६ जणांच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकड़े सदस्यत्व रद्द करण्याबाबत तक्रार अर्ज केला होता.भंडारकवठे ग्रामपंचायतीची २०२१ मध्ये निवडणूक झाली होती.यात ६ सदस्य वेगवेगळ्या वार्डातून निवडून आले होते.मात्र निवडून आल्यानंतर ६ जणांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निवडणुकीसाठी झालेला खर्च सादर केला नव्हता.त्यानुसार तक्रारदार कुगणे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४, ब (१) नुसार ६ जणांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती.त्यानंतर याबाबत अर्जदार व समोरची बाजू अशी दोघांची सुनावणी जिल्हाधिकारी यांच्याकडे झाली.२७ सप्टेंबर २०२३ रोजी यावर अंतिम सुनावणी झाली.त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गुरुवारी सर्व ६ जणांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निकाल दिला.या प्रकरणात अर्जदार सिद्धेश्वर महादेव कुगणे यांच्याकडून अँडव्होकेट शरद पाटील यांनी तर विरोधी गटाकडून अँडव्होकेट मंजुनाथ कक्कळमेली यांनी काम पाहिले.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments