Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

एका मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

एका मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

एका मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या परमेश्वर श्रीशैल तुपे (रा.औज,ता.दक्षिण सोलापूर) याला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किशोर संत यांनी अपिलात जामीन मंजूर केला आहे. १० मे २०१५ रोजी एका मुलीवर अत्याचार केला होता. त्यानंतर २९ जुलै २०१५ रोजी आरोपी आणि त्याचा भाऊ प्रशांत या दोघांनी पीडितेस दमदाटी करून ठार मारण्याची धमकी दिली होती. पीडितेने ३० जुलै २०१५ रोजी मंद्रुप पोलिस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. जिल्हा न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली आणि त्यात आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. या शिक्षेविरुद्ध आरोपी परमेश्वर तुपे याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. खटल्यातील साक्षीदारांच्या साक्षीमधील विसंगती असल्याचा मुद्दा अँड.रितेश थोबडे यांनी मांडलेला

युक्तिवाद ग्राह्य धरत उच्चन्यायालयाने आरोपीस ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.



आरोपीतर्फे अँड. रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे अँड.एम.आर.तिडके यांनी काम पाहिले.

 दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments