Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

होटगी स्टेशनचे सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्या विरोधातील तीन अपत्याची तक्रार जिल्ह्याधिकाऱ्यांनी फेटाळली; ॲड. मंजुनाथ कक्कळमेली यांची माहिती

 होटगी स्टेशनचे सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्या विरोधातील तीन अपत्याची तक्रार जिल्ह्याधिकाऱ्यांनी फेटाळली; ॲड. मंजुनाथ कक्कळमेली यांची माहिती



दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन ग्रामपंचायतचे सरपंच जगन्नाथ गायकवाड यांना तीन अपत्य असल्याची तक्रार जिल्ह्याधिकाऱ्यांकडे करण्यात

आली होती. मात्र हयात अपत्य दोनच असल्याने सदर तक्रार अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळल्याने सरपंच गायकवाड यांना दिलासा मिळाला आहे.होटगी स्टेशन ग्रामपंचायतचे सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्या विरोधात सरपंच यांना सन २००१ च्या अगोदर २ आणि नंतर १ अशी एकूण तीन अपत्य आहेत. तीन अपत्य असल्याकारणाने जगन्नाथ गायकवाड हे सरपंच पदावर राहण्यास अपात्र आहेत, अशा आशयाची तक्रार कृष्णानंद कोकरे यांनी सोलापुरच्या जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती.त्यास सरपंच जगन्नाथ गायकवाड यांनी अॅड. मंजुनाथ कक्कलमेळी यांच्या तर्फे हजर होऊन युक्तिवाद केला.


या प्रकरणी अॅड. कक्कळमेळी यांनी सरपंचांना तीन अपत्य असणारी बाब खरी आहे. पण त्यापैकी १९९४ साली जन्मलेले मूल हे २०१९ साली मृत झाले आहे. शिवाय निवडणूक नाम निर्देशन पत्रा मध्ये 'फक्त हयात' असलेल्या मुलांची संख्या विचारलेली आहेत. त्यामुळे हा अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती ॲड. मंजुनाथ कक्कळमेली यांनी शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिली.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments