Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

चिंचोली एमआयडीसीतील ड्रग्ज प्रकरणातील कारखान्याची पोलिस महानिरीक्षक दिलीप भुजबळ- पाटील यांनी केली पाहणी

मोहोळ तालुक्यातील देवडी येथे एमडी ड्रग्ज विक्री प्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी दत्तात्रय लक्ष्मण घोडके,राहुल आणि अतुल गवळी बंधू हे नातेवाईक असल्याचे निष्पन्न झाले आहे.गवळी बंधू चिंचोली एमआयडीसी ड्रग्ज प्रकरणात आधीच अटकेत आहेत.दरम्यान,मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींना देवडी ड्रग्ज विक्री प्रकरणातही आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली.नातेवाईक असल्याने दोघांनी कोणाला अमली पदार्थ विकले,याचा तपास ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.अंमली पदार्थ विक्री प्रकरणात दत्तात्रय लक्ष्मण घोडके व गणेश उत्तम घोडके, (रा.औंढी,ता,मोहोळ) यांना अटक झाली असून त्यांना न्यायालयाने २३ ऑ


क्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.त्यांच्या अटकेसाठी ग्रामीण पोलिस दीड महिन्यापासून रेकी करीत होते.पारोपींच्या अटेकासाठी पथके तयार करण्यात आली होती. दरम्यान,गवळी बंधूंना मुंबई गुन्हे शाखेने अंमली पदार्थासह मुंबईत अटक केली.त्यानंतर चिंचोली एमआयडीसीतील ड्रग्ज कारखानाही सील केला.या घटनाक्रमानंतर मुंबई,पुणे,नाशिकनंतर अंमली पदार्थाचे लोण सोलापुरातही पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे.याची तीव्रता लक्षात घेऊन पोलिस महानिरीक्षक दिलीप भुजबळ-पाटील हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते.त्यांनी सकाळच्या सुमारास चिंचोली एमआयडीसीतील एमडी ड्रग्जची निर्मिती करणाऱ्या कारखान्याची पाहणी केली.काही बंद पडलेल्या कारखान्यांचीही पाहणी केल्याचे समजते.तेथे काय मिळाले याची माहिती पोलिसांकडून गुप्त ठेवण्यात आली आहे.पोलिस महानिरीक्षकांनी पाहणीनंतर मुख्यालयात बैठक घेतली.पोलिस अधिक्षक,उप अधीक्षक यांना तपासाच्या सूचना दिल्या.अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी ग्रामीण पोलिस प्रशासनही आता सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....


Post a Comment

0 Comments