Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

माळकवठे येथील जळालेल्या पपई बागेचा तज्ज्ञ समितीकडून पंचनामा पूर्ण, दोन दिवसात अहवाल देणार

साडेचार एकरावर असलेल्या पपई बागेला कीटकनाशक फवारल्यानंतर पाने करपल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथे घडली होती.बागेच्या झालेल्या नुकसानीवरून शेतकरी उमेश वाघमारे यांनी मंद्रूप येथील बिराजदार कृषी केंद्राच्या विरोधात जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक,कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रार दिली होती.या तक्रारीनुसार शुक्रवारी तज्ज्ञ समितीने माळकवठे येथे जाऊन बागेचा पंचनामा केला आहे.'माझ्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्या,अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब उपोषण करतो', असा इशारा शेतकरी वाघमारे यांनी या निवेदनात दिला होता.त्यांच्या

या निवेदनानुसार कृषी विभागाने उपविभागीय कृषी अधिकारी डी.वाय.कटके यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती.या समितीने माळकवठे येथे जाऊन

प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली.या समितीमध्ये दक्षिण सोलापूरचे तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी,सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ समाधान जवळगे,शेतकरी आणि कंप



नीचे प्रतिनिधी,औषध विक्रेते व समितीच्या सदस्य सचिव तथा दक्षिण सोलापूरच्या कृषी अधिकारी ओहोळ यांचा

समावेश आहे.सदर पाहणीचा व नुकसानीचा अहवाल येत्या दोन दिवसात आम्ही संबंधित शेतकऱ्याला देणार आहोत,असे कृषी अधिकारी रामचंद्र माळी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments