Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

महाआवास अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल निंबर्गी ग्रामपंचायत ९८.८ टक्के गुण घेऊन राज्यात प्रथम

 महाआवास अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल निंबर्गी ग्रामपंचायत ९८.८ टक्के गुण घेऊन राज्यात प्रथम 





दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी ग्रामपंचायत महाआवास अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल ९८.८ टक्के गुण घेऊन राज्यात प्रथम आली आहे.महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत राज्यस्तरीय अंमलबजावणी संनियंत्रण व मूल्यमापन समितीने या ग्रामपंचायतीची निवड जाहीर केली आहे.तसेच मागील वर्षी वाळू उपलब्ध नसताना वाळूला पर्याय म्हणून क्रश सॅण्ड,सिमेंट ब्लॉक,फ्लाय अँश ब्रिक्स,इंटर लॉकिंग,हॉलो ब्रिक्सचा वापर करून ११ हजार ८६६ घरकुलांचे काम केल्याबद्दल तसेच घरकूल बांधकामांमध्ये फरशी /लादी,रंगरंगोटी,किचन गार्डन,परसबाग,रेन वॉटर हार्वेस्टिंग,सौरऊर्जा,साधने व नेट बिलिंग आदीचा वापर करून सर्वाधिक ११ हजार ३५४ घरकूल बांधल्याबद्दल सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम आला आहे.


आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास,ग्रामीण गृहनिर्माण नवी मुंबईच्या राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक डॉ.राजाराम दिघे,इतर मागास बहुजन विकास विभागाचे कक्ष अधिकारी श्रीनाथ हेंद्रे,सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे

अपर सचिव अनिल अहिरे यांच्यासह इतर मागास बहुजन विकास विभागाचे कक्ष अधिकारी सुशांत कुंभार यांच्या समितीने हे पुरस्कार जाहीर केले आहेत.


महाआवास अभियानात निंबर्गी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सरपंच श्रीदीप हसापुरे,ग्रामसेवक नागेश जोडमोटे यांचे मुख्य कार्यकारी

अधिकारी मनीषा आव्हाळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी अभिनंदन केले आहे.सरपंच श्रीदीप हसापुरे यांनी वर्षभरात उत्कृष्ठ काम केल्याने हा पुरस्कार निंबर्गी ग्रामपंचायतीला मिळाला आहे.सरपंच श्रीदिप हसापुरे यांचे वडील सुरेश हसापुरे यांचा उत्कृष्ट कामाबद्दल आदर्श जिल्हा परिषद सदस्य म्हणून यापुर्वी सन्मान करण्यात आला आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments