Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

पानमंगरुळ येथे पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीस जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर ; ॲड.नागेश खिचडे यांची माहिती

 पानमंगरुळ येथे पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीस जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर ; ॲड.नागेश खिचडे यांची माहिती



अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरुळ येथील अटकेतील आरोपी हणमंत शंकर अरबळ,वय-33 वर्षे यांची पत्नीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधिश के.डी.शिरभाते यांनी सशर्त जामीन मंजूर केल्याची माहिती आरोपीचे वकील ॲड.नागेश खिचडे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.यात आरोपी तर्फे ॲड.नागेश तर सरकार तर्फे ॲड.प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले.

यात हकीकत अशी की,यातील फिर्यादी श्रीशैल शिवराय बिराजदार वय-54 वर्षे, रा.शिरवळ (जैनापूर), ता.दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांची मुलगी विजयालक्ष्मी हिचे आरोपीसोबत दि.26/12/2012 रोजी लग्न झाले होते.आरोपीस श्रावणी व आदर्श असे दोन मुले आहेत.सुमारे दोन ते तीन वर्षापासून आरोपीस दारु पिण्याचे व्यसन लागले होते. तेंव्हापासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत असे. आरोपीचे समजूत काढूनही मारहाण करीत असल्याने विजयालक्ष्मी ही तिच्या दोंन्ही मुलांना घेऊन 5-6 महिन्यापुर्वी माहेरी आली होती. त्यावेळेस गावातील प्रतिष्ठित लोकांमार्फत आरोपींकडे नांदण्यास सोडून आले होते. त्यानंतरही आरोपीने चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण व शिवीगाळ करण्यास चालूच होते. 

दिनांक 04/09/2023 रोजी सकाळी 9.00 वाजता आरोपीने पत्नीस शिवीगाळ व लाथाबुक्याने मारहाण केल्याने, होत असलेल्या त्रासामुळे पत्नी विजयालक्ष्मी ही विषारी औषध प्राशन केली होती, तिला उपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल सोलापूर येथे आरोपीने दाखल केले असता, उपचारा दरम्यान दि.08/09/2023 रोजी मयत झाली. सदर घटनेची फिर्यादी 23/09/2023 रोजी अक्कलकोट दक्षिण सोलापूर येथे भा.दं.वि. 306, 498अ प्रमाणे गुन्हा दाखल होऊन तपासीक अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एच.काकडे यांनी आरोपीस अटक करुन न्यायालयासमोर हजर केले होते. 

सदर आरोपीचे जामीन अर्जाचे युक्तीवाद वेळी आरोपींचे वकिल अॅड.नागेश खिचडे यांचे सदर घटनेची फिर्याद उशीरा नोंद झाल्याची व मयत तसेच आरोपींचे आईवडीलांचे कोणताही जबाब दोषारोपपत्रात नसल्याचे तसेच कोणतेही विषारी औषध जप्त केले नाही असा युक्तीवाद मांडला सदरचा युक्तीवाद ग्राह्र धरुन मा.जिल्हा न्यायाधीशांनी आरोपीस सशर्त जामीन मंजूर केले.

यात आरोपी तर्फे अॅड.नागेश खिचडे तर सरकार तर्फे अॅड.प्रकाश जन्नू यांनी काम पा

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments