Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

अकोले मंद्रूप येथे वहिवाटीचा बंद रस्ता का खोललीस म्हणून 80 वर्षीय वृद्ध महिलेस एका महिलेने केली काठीने मारहाण; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू

 अकोले मंद्रूप येथे वहिवाटीचा बंद रस्ता का खोललीस म्हणून 80 वर्षीय वृद्ध महिलेस एका महिलेने केली काठीने मारहाण; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू


दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रूप येथे मंगल गोपाळ जाधव (वय वर्ष 80),राहणार अकोले मंद्रूप,तालुका दक्षिण सोलापूर यांना दिनांक 21 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शेतातील वहिवाट्याचा रस्ता बंद केला होता ते तू का खोललीस म्हणून कांचन दिनेश जगताप यांनी काठीने जबर मारहाण केले.या मारहाणीत मंगल जाधव या वृद्ध महिलेच्या उजव्या हाताला जखम आणि सर्वांगास मुका मार लागल्याने त्यांना मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून रेफरने सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुलगा कुंडलिक जाधव यांनी दाखल केले.रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सोमवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments