Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

तेरामैल आणि टाकळी येथून 2 सराईत गुन्हेगार ग्रामीण पोलीस दलाकडून जेरबंद, सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

तेरामैल आणि टाकळी येथून 2 सराईत गुन्हेगार ग्रामीण पोलीस दलाकडून जेरबंद, सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल जप्त





बावीस गुन्ह्यांत पाहिजे असलेला आरोपी व सहा गुन्ह्यात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. या कारवाईत हरीण, ८ काळविटाची १० शिंगे, चार जाळे, १२२.५ ग्रॅम वजनाचे सोने, ३३.५ तोळे चांदीचे दागिने यासोबतच देशी बनावट एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, जंगली प्राणी पकडण्यासाठी लागणारे जाळे जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकातील सहायक फौजदार ख्वाजा मुजावर यांना अक्कलकोट तालुक्यातील चिंचोळी येथे राहणारा व्यक्ती गावठी पिस्तूल बाळगून टाकळी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे निंबाळकर व डांग यांनी टाकळी चौकात सापळा लावला. सापळ्यात संशयित व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टीत खोवलेले १ देशी बनावटी पिस्तूल, जिवंत काडतुसे मिळून आली आहेत. या घटनेचा पुढील तपास मंदुप पोलिस करीत असल्याची माहिती शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.


आणखीन एका गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिस उप निरीक्षक रविराज कांबळे यांच्या पथकाला अक्कलकोट तालुक्यातील कल्लकर्जाळ येथील दुसरा आरोपी हा दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरामैल चौकात आला असल्याची माहिती मिळाली होती. या पथकाने तेरामैल चौकात सापळा लावून एकास ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींकडून ५ लाख १३ हजार ६४९ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन सहा. पोलिस निरीक्षक धनंजय, पोलिस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर, पोलिस उपनिरीक्षक रविराज कांबळे, पीएसआय राजु डांगे, राजेश गायकवाड, महमद इसाक मुजावर, श्रीकांत गायकवाड, परशुराम शिंदे, धनाजी गाडे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, रवि माने, अन्वर अस्तार, समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, यश देवकाते, समीर शेख, सतीश कापरे यांनी बजावली आहे.


'वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ९ प्रमाणे दोन्ही आरोपींच्या गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आली असून दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सोलापूर ग्रामीण पोलिस करीत असल्याची माहिती शनिवारी ग्रामीण पोलीस दलाकडून प्रेसनोटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

   ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल

Post a Comment

0 Comments