सोलापूर |हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : आज 11 एप्रिलचा दिवस बोरामणी गटाचे मा. पंचायत समिती सदस्य धनेश सुभाष आचलारे यांच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा ठरला. ‘संघर्षनायक मीडिया’ यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “आदर्श समाजभूषण पुरस्कार २०२६” त्यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा सोलापुरातील निर्मलकुमार फडकुले सभागृहात उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
धनेश आचलारे यांनी समाजातील वंचित, गरजू आणि सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पुरस्कार स्वीकारताना धनेश आचलारे यांनी हा सन्मान आपल्या एकट्याचा नसून बोरामणी गटातील सर्व नागरिक, मित्रपरिवार, सहकारी आणि कुटुंबीय यांचा असल्याचे नमूद केले. “आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच मला समाजासाठी काम करण्याची प्रेरणा आणि ताकद मिळाली,” असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
तसेच ‘संघर्षनायक मीडिया’ परिवाराचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. पुढील काळातही समाजासाठी अधिक जोमाने कार्य करत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या पुरस्कारामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला नवी दिशा आणि उर्जा मिळणार असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!


0 Comments