सोलापूर ग्रामीण|हॅलो रिपोर्टर न्यूज|मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर : सोलापूर ग्रामीण पोलीस दलासाठी आपत्ती व्यवस्थापन विषयक विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन आज दि. 10 एप्रिल 2026 रोजी पोलीस मुख्यालयातील संवाद हॉल येथे करण्यात आले.
मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साधनसामग्रीचा योग्य वापर, तसेच नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी तात्काळ व प्रभावी प्रतिसाद कसा द्यावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर प्रशिक्षण Creative New Tech Limited या संस्थेतर्फे देण्यात आले. यावेळी संस्थेतील प्रोजेक्ट मॅनेजर सौ. सानिका निर्गुण, श्री शक्तीसागर ढोले तसेच श्री महेश काळोखे यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे विविध पैलू, आधुनिक उपकरणांचा वापर आणि प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे सखोल प्रशिक्षण दिले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना आपत्तीच्या काळात प्रशिक्षित मनुष्यबळ व योग्य साधनसामग्रीमुळे जीवित व मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी करता येते, असे अधोरेखित करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सुरक्षा शाखेतील पीएसआय श्री. धनाजी ओमासे, ग्रेड पीएसआय श्री. सतीश शिंदे तसेच महिला पोलीस हवालदार अंबरकर यांची उपस्थिती होती.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करणारा ठरला असून, भविष्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरेल असे मत व्यक्त करण्यात आले.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

0 Comments