सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुमठा तांडा येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर १५ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पृथ्वीराज संजय राठोड असे मृत मुलाचे नाव आहे.

घटनेचा आढावा:

पृथ्वीराज हा घरातील सर्वांचा लाडका होता. काहीशा हट्टी स्वभावामुळे तो रागाच्या भरात घर सोडून जाण्याची सवय होती. रविवारी देखील एका छोट्याशा कारणावरून तो घरातून निघून गेला. दिवसभर त्याचा शोध घेऊनही काहीच पत्ता लागला नाही. रात्री उशिरा आई त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असताना घराजवळील झुडपात मोबाईलचा प्रकाश दिसून आला. शंका आल्याने जवळ जाऊन पाहिले असता, तो झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.


कुटुंबीयांचा आक्रोश:

पृथ्वीराज हा दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. त्याचे वडील रुग्णवाहिका चालक म्हणून काम करतात. घरातील लाडक्या मुलाने असे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


पोलिसांची कारवाई:

घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, अशोक तरंगे व सागर सांगळे यांनी घटनास्थळी भेट देत आवश्यक ती कार्यवाही केली.


उपचारांपूर्वीच मृत्यू:

घटनेनंतर पृथ्वीराजला तातडीने अश्विनी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात नातेवाईक व ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.


समाजात हळहळ:

क्षणिक राग आणि भावनिक असंतुलनामुळे एका तरुणाचे आयुष्य संपुष्टात आल्याने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!