Advertisement

Breaking News
Loading...

वागदरी येथील श्री एस. एस. शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी...

 


अक्कलकोट | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील श्री एस. एस. शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी महाविद्यालय परिसरात अभिवादन करून डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमात प्राचार्य अनिल देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच पर्यवेक्षिका सौ. शैलशिल्पा जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

Post a Comment

0 Comments