Advertisement

Breaking News
Loading...

धुळखेड येथे भीषण अपघात – स्कॉर्पिओ आणि दुचाकीच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू...

 

सोलापूर प्रतिनिधी :

धुळखेड ( ता. इंडि, जिल्हा विजयपूर ) परिसरात शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत तरुणाचे नाव सुखलाल भोई (रा. ख्याडगी, ता. इंडि, जि. विजापूर) असे आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सुखलाल भोई हा आपल्या दुचाकीवरून लग्न कार्यानिमित्त सोलापूरकडे जात असताना धुळखेडजवळ समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत सुखलाल याला गंभीर दुखापत झाली असून, तो जागीच ठार झाला. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीचा चक्काचूर झाला आणि स्कॉर्पिओ रोडवरून शेतात जाऊन पलटी झाली.



अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.


या प्रकरणी स्कॉर्पिओ वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.


या दुर्दैवी अपघातामुळे धुळखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुखलाल भोई हे मेहनती व शांत स्वभावाचे तरुण म्हणून ओळखले जात होते.


Post a Comment

0 Comments