Advertisement

Breaking News
Loading...

खुल्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत मंद्रूपचा डंका..! 28 सुवर्ण, 8 रौप्य, 4 कांस्य पदकांची लयलूट...

 


मंद्रूप / दक्षिण सोलापूर प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: बारामती येथे झालेल्या खुल्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत दक्षिण सोलापूर तायक्वांदो अकॅडमी, मंद्रूपच्या खेळाडूंनी सुवर्णकामगिरी करत शानदार यश मिळवले. अकॅडमीच्या ४० खेळाडूंनी एकूण २८ सुवर्ण, ८ रौप्य आणि ४ कांस्य पदकांची लयलूट केली. या अभूतपूर्व कामगिरीमुळे मंद्रूपचा डंका राज्यभर जोरात वाजला आहे.

७ डिसेंबर रोजी इंग्लिश मीडियम स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन, बारामती यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध गटांमध्ये मंद्रूपच्या खेळाडूंनी आपली ताकद सिद्ध करत नेत्रदीपक प्रदर्शन केले.



🥇 सुवर्णपदक विजेते खेळाडू:
पोर्णिमा खंदारे, श्रावणी नंदुरे, सफीना शेख, श्रेया पवार, स्वप्नाली पवार, नंदिनी मुगळे, दिव्या पवार, आरोही कंदले, समृद्धी लोभे, हयाती पवार, वंश राठोड, अमन शेख, समर्थ चव्हाण, अभिजीत खरात, हर्ष सरवदे, अभिषेक वाले, अथर्व शिंगडगाव, संग्राम नवले, सुमेध पोतदार, वैभव घाले, आयुब शेख, मोहन चव्हाण, शुभम पवार, मोहन चव्हाण, सुवेध पोतदार, साक्षी खंदारे, आराध्या राठोड, रविराज कुसुरे.

🥈 रौप्य पदक विजेते:  
क्रिशा पवार, आरोही भागवत, श्रावणी पवार, प्राजक्ता पांढरे, सुमया शेख, अबूबकर नदाफ, समर्थ चव्हाण, प्रेम चव्हाण.

🥉 कांस्यपदक विजेते:
महासिद्ध कुंभार, सार्थक पवार, आरोही खंदारे, समर्थ चव्हाण.

या स्पर्धेत पुणे, सोलापूर, सांगली, बीड आणि इतर जिल्ह्यांतील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक शिवराज मुगळे यांचे मार्गदर्शन लाभले.

या भव्य यशाबद्दल दक्षिण सोलापूर तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष प्रविण जोडमोटे, तसेच रेश्मा राठोड, सचिन कुंभार, सिद्धाराम विजापूरे, प्रिती राठोड यांनी सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments