Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूपच्या लिटिल स्टार पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचे उत्साहात उद्घाटन...

 


मंद्रूप / दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: लिटिल स्टार पब्लिक स्कूल, मंद्रूप येथे मंगळवार दिनांक 09 डिसेंबर 2025 रोजी क्रीडा सप्ताह उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. यंदाच्या क्रीडा सप्ताहाचे हे द्वितीय वर्ष असून विद्यार्थ्यांमध्ये खेळांविषयी उत्सुकता आणि उत्साह पाहायला मिळाला.


कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे अध्यक्ष आप्पासाहेब काळे, सहसचिव प्रमोद व्हनकोरे, लिटिल स्टार पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा कोरे तसेच श्री सद्गुरू धुळेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुलोचना पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करून क्रीडा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.


या सप्ताहात रनिंग, लेमन स्पून, फ्रॉक जंप, बुक बॅलन्सिंग, म्युझिक चेअर, टू-लेग रेस, बॉल कलेक्शन, सॅक रेस अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका स्मिता सुतार यांनी कुशलतेने केले.


यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा कोरे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट करत शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासात क्रीडेची भूमिका अधोरेखित केली. विविध खेळांमध्ये सहभागी होताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments