Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप ZP गटातून काँग्रेसकडून जिल्हा सचिव महमद शेख यांच्या पत्नी सौ. सनाकौसर शेख यांची काँग्रेसकडून उमेदवारीची अधिकृत मागणी...

 


मंद्रूप/ दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवले आहेत. याच पार्श्वभूमीवर मंद्रूप जिल्हा परिषद गटातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव महमद शेख यांच्या पत्नी सौ. सनाकौसर महमद शेख यांनी सर्वसाधारण महिला जागेसाठी इच्छुक उमेदवारी अर्ज सादर केला.

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार, वरिष्ठ उपाध्यक्ष सुदर्शन अवताडे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, उपाध्यक्ष राधाकृष्ण पाटील, तालुका उपाध्यक्ष अमीर शेख, सेवादल यंग ब्रिगेड तालुका अध्यक्ष मौलाली शेख, उपाध्यक्ष दत्ता पवार, बालाजी जाधव तसेच मंद्रूप ZP गटातील काँग्रेस कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला.

मंद्रूप जिल्हा परिषद गटातून काँग्रेसकडून ही उमेदवारी प्रमुख दावेदार म्हणून पाहिली जात आहे.


Post a Comment

0 Comments