मोहोळ हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी : मौजे शिरापूर (सो) ते लोकमंगल साखर कारखाना (ग्रामा 29) या मुख्य रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून सर्वत्र मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्याने दररोज शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि कारखान्यात कामाला जाणारे कामगार मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मात्र रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या आठ वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ग्रामस्थांनी निवेदने, आंदोलने, उपोषणे करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासंदर्भात अनिल अबाजी पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, उपअभियंता बांधकाम विभाग, तसेच मोहोळ पोलीस स्टेशन यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की —
✔ रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा
✔ अन्यथा 11 डिसेंबर 2025 पासून राज्यभरातील शासकीय कार्यालये, आमदार-खासदार यांच्या कार्यालयांसमोर ‘भिक मागो’ बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल
✔ आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार असेल
स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

0 Comments