सोलापूर ग्रामीण|हॅलो रिपोर्टर न्यूज: सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या सन 2024-25 या वर्षातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी सुरुवात करण्यात आली आहे.
पहिल्या दिवशी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीसाठी एकूण 500 उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. त्यापैकी 339 उमेदवार प्रत्यक्ष हजर राहिले.
हजर उमेदवारांपैकी शारीरिक मोजमाप तपासणीदरम्यान 36 उमेदवार अपात्र ठरले. उर्वरित 303 उमेदवारांची 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे व गोळाफेक या मैदानी चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये 142 उमेदवार अपात्र ठरले असून एकूण 161 उमेदवार शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीत पात्र ठरले आहेत.
दरम्यान, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सर्व उमेदवारांना आवाहन केले आहे की, भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारचे प्रलोभन किंवा आमिष दाखविणाऱ्या व्यक्तींची तात्काळ माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयास द्यावी.
तसेच दिनांक 12 जून 2026 रोजी एकूण 1000 उमेदवारांना सकाळी 5.30 वाजता पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर येथे भरती प्रक्रियेसाठी हजर राहण्याचे कळविण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या निवासाची व्यवस्था पोलीस मुख्यालयासमोरील ‘अचीव्हर्स हॉल’ येथे करण्यात आली असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
.jpeg)

0 Comments