Advertisement

Breaking News
Loading...

धनेश आचलारे यांच्या कृतज्ञता मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद; माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची उपस्थिती...

 


बोरामणी | हॅलो रिपोर्टर न्यूज | निवडणूक विशेष वृत्तांकन : डॉ. राजदत्त रासोलगीकर

बोरामणी जिल्हा परिषद गटाचे शिवसेना नेते श्री. धनेश सुभाष आचलारे यांच्या वतीने बुधवारी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता मेळाव्यास बोरामणी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार बांधव व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा मेळावा बोरामणी येथील आचलारे फार्महाऊस येथे पार पडला.



जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाला माजी गृहराज्यमंत्री श्री. सिद्धाराम म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कार्यकर्त्यांना खचून न जाता नव्या जोमाने काम करण्याचे आवाहन केले. लोकशाहीत जय-पराजय हा प्रवासाचा भाग असून जनतेचा विश्वास हीच खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.




श्री. धनेश आचलारे यांनी आपल्या मनोगतात सर्व मतदार, मित्रपरिवार, कार्यकर्ते व शिवसैनिकांचे मनःपूर्वक आभार मानले. पराभव हा शेवट नसून पुढील यशाची सुरुवात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. काही कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले, इतका भावनिक प्रसंग त्या ठिकाणी निर्माण झाला होता.



राजकीय पुनर्वसन करण्याबाबत उपस्थितांनी केलेल्या आग्रहावर माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पक्षातील वरिष्ठांकडे निश्चितपणे प्रयत्न करण्याचा शब्द दिला.



या मेळाव्यास बोरामणी जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































Post a Comment

0 Comments