Advertisement

Breaking News
Loading...

मनगोळी येथे ऊसतोड हंगामाची सांगता; ट्रॅक्टर पूजेतून कष्टांचा गौरव...

 


मनगोळी | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लू अण्णा कांबळे:

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथे ऊसतोड कामगारांचा चालू हंगाम नुकताच संपन्न झाला. शेवटच्या दिवशी परंपरेनुसार ट्रॅक्टरची पूजा करून “पट्टा पडला” असल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी कामगारांनी आपल्या कष्टमय प्रवासाचा भावनिक समारोप केला.


या पथकामध्ये बब्बू शेख, ज्ञानेश्वर डिरे, कमलाकर डिरे, जावेर माऊली, बुडू नदाफ, अमीर नदाफ, न्हया मस्के व पंडू मस्के या कामगारांचा समावेश होता. संपूर्ण हंगामभर या सर्वांनी प्रतिकूल परिस्थितीत ऊसतोडीचे काम पूर्ण केले.

विशेष म्हणजे ज्ञानेश्वर डिरे हे आजारी असतानाही हंगामात सहभागी झाले होते. “आजारी असल्यामुळे माझ्या हातून ऊसतोड होणार नाही, असे काहीजण सांगत होते. मात्र मी धीर न सोडता काम सुरू ठेवले आणि शेवटपर्यंत यशस्वीपणे ऊसतोड पूर्ण केली,” असे ज्ञानेश्वर डिरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांच्या जिद्दीची उपस्थितांनी दाद दिली.

हंगामाच्या समाप्तीनिमित्त ट्रॅक्टर सजवून पूजा करण्यात आली, नारळ फोडण्यात आला आणि सर्व कामगारांनी एकमेकांचे अभिनंदन केले. आता “पट्टा पडल्याने” हे कामगार आपल्या गावी परतणार असून पुढील हंगामाची तयारी करणार आहेत.

कष्ट, जिद्द आणि एकोप्याच्या बळावर मनगोळीतील या ऊसतोड पथकाने हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments