मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर :
सन 2025-26 गळीत हंगामातील थकीत ऊस बिले तात्काळ अदा करावीत, अन्यथा २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्रात कोठेही आत्मदहन करू, असा इशारा डिजिटल शेतकरी संघटना शिरापूर (सो)चे संस्थापक अध्यक्ष अनिल अबाजी पाटील यांनी दिला आहे.
याबाबत मा. जिल्हाधिकारी सोलापूर, साखर आयुक्तालय, प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय सोलापूर तसेच पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. ऊस गळीतास गेल्यानंतर १४ दिवसांत पहिला हप्ता देणे बंधनकारक असतानाही अनेक कारखान्यांकडून देयके प्रलंबित असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


0 Comments