Advertisement

Breaking News
Loading...

छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये अंतरमहाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्न...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या अंतर्गत आयोजित अंतरमहाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धा 2025 चे आयोजन छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथे उत्साहात पार पडले. या स्पर्धेत 15 महाविद्यालयांतील खेळाडूंनी सहभाग घेत आपली शारीरिक क्षमता आणि कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

प्राचार्य डॉ. नितीन मोटे यांनी मार्गदर्शन करताना खेळाडूंनी शरीरसौष्ठव घडविताना डोपिंगविषयी योग्य माहिती घेणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. अतिरिक्त औषधांचे सेवन केल्याने हृदयविकार, पक्षाघात तसेच मूत्रपिंड विकार यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात, याची जाणीव करून देत त्यांनी खेळाडूंनी योग्य आहार-विहार, शिस्तबद्ध सराव आणि वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून करिअर घडवावे, असे आवाहन केले.

स्पर्धेसाठी पंच म्हणून सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सचिव प्रमोद काटे, माजी क्रीडा अधिकारी नजिर शेख, गोरख गडसिंग आणि शकील बडेकर यांनी काम पाहिले. यावेळी प्रा. सचिन गायकवाड (मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर), सोलापूर विद्यापीठ स्पोर्ट्स कौन्सिलचे सचिव प्रा. विशाल होनमाने, डॉ. शिवानंद तोरवी, प्रा. नंदकिशोर देशपांडे, डॉ. आनंद धवन, निवड समितीचे प्रमुख धनंजय देशमुख, डॉ. अशोक पाटील, डॉ. किरण चोकाककर, डॉ. बारस्कर, प्रा. डिसले आदी उपस्थित होते.


स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :

60 किलो गट :

प्रथम – योगेश जाधव (शिवाजी महाविद्यालय, बार्शी)

द्वितीय – दिप्तराज साळुंखे (कोर्टी इंजिनिअरिंग कॉलेज, पंढरपूर)

तृतीय – सुशांत वाघमारे (एच. एन. कॉमर्स कॉलेज, सोलापूर)


65 किलो गट :

प्रथम – व्यंकटेश काळे (छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज, सोलापूर)

द्वितीय – शेख हजरतअली (दयानंद कॉलेज, सोलापूर)

तृतीय – वैभव जाधव (बी. पी. सोलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी)


70 किलो गट :

प्रथम – शाबाद नदाफ (वसुंधरा कला महाविद्यालय, जुळे सोलापूर)

द्वितीय – संकेत विभुते (देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय, मोहोळ)

तृतीय – दीपक फरतडे (छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज, सोलापूर)


75 किलो गट :

प्रथम – निखिल चव्हाण (वसुंधरा कला महाविद्यालय)

द्वितीय – रमेश धोडमणी (छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज, सोलापूर)


80 किलो गट :

प्रथम – लक्ष सुरवसे (उमा महाविद्यालय, पंढरपूर)

द्वितीय – अथर्व अनगुडे (छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज, सोलापूर)

तृतीय – सुमित जाधव (शिवदारे महाविद्यालय, सोलापूर)


85 किलो गट :

प्रथम – ओम ज्ञानेश्वर भिवटे (के. बी. पी. कॉलेज, पंढरपूर)


90 किलो गट :

प्रथम – शेख साहिल (वालचंद आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, सोलापूर)


विजेत्या खेळाडूंना महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. स्पर्धेचे प्रास्ताविक प्रा. संतोष गवळी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अमोल वाघमोडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अरुण सोनकांबळे यांनी केले.

ही स्पर्धा खेळाडूंमध्ये निरोगी स्पर्धात्मकता, शिस्त आणि व्यावसायिक दृष्टिकोन वाढविणारी ठरली.



Post a Comment

0 Comments