मंद्रुप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दि. २९ मार्च २०२६ : मंद्रुप पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी अत्यंत तत्पर कारवाई करत अपहरण झालेल्या युवकाची अवघ्या ८ तासांत सुखरूप सुटका करून ५० लाखांच्या खंडणीचा मोठा डाव उधळून लावला आहे.
मंद्रुप पोलीस ठाण्यात गु.र. नं. ८७/२०२६, बीएनएस कलम १४०(२) अंतर्गत दि. २८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी श्रीमती निकिता सुरज राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती सुरज अर्जुन राठोड (वय २५) हे दि. २४ मार्च रोजी दुपारी विजापूरला जात असल्याचे सांगून त्यांच्या फॉर्च्युनर (MH-18 BP-1852) गाडीतून घरातून निघाले होते. मात्र, ते परत न आल्याने संशय निर्माण झाला.
यानंतर दि. २६ मार्च रोजी सुरज राठोड यांनी त्यांच्या वडिलांना फोन करून आपले अपहरण झाल्याची माहिती दिली. तसेच अपहरणकर्त्यांनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली असून पैसे न दिल्यास जीव मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कर्नाटकातील सिंदगी, अफजलपूर, कलबुर्गी आणि विजापूर या भागात शोधमोहीम राबवली. या मोहिमेत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे:
गोपाळ मल्लाप्पा जवळगी (वय ३०, रा. वत्याळ, ता. सिंदगी, जि. विजापूर)
राघवेंद्र यल्लप्पा जवर्गीकर (वय २७, रा. बसवनगर, कलबुर्गी)
भवानीराज अरविंद गोडबोले (वय २९, रा. बसवनगर कलबुर्गी)
तसेच अपहरणात वापरलेली फॉर्च्युनर कार आणि KA-32-C-9990 क्रमांकाची अन्य कार पोलिसांनी जप्त केली आहे.
या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी अपहरण झालेल्या सुरज राठोड यांची सुखरूप सुटका केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पटवारी करत आहेत.
ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व मंद्रुपचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
या पथकात पुढील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते :
पो.उपनिरीक्षक राज डांगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार परशुराम शिंदे, नारायण गोलेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहन मनसावाले, पोलीस शिपाई संदीप काळे, सागर चव्हाण, अक्षय डोंगरे तसेच चालक पोलीस शिपाई बुरूकुल.
या कारवाईमुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

0 Comments