मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : मंद्रूप येथील इंदिरानगर परिसरातील एका अल्पवयीन मुलीचा मागील 15 ते 20 दिवसांपासून काहीच ठावठिकाणा लागलेला नसल्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी संबंधित कुटुंबीयांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही मुलीचा शोध घेण्यात पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
याच्या निषेधार्थ संतप्त नातेवाईकांनी मंद्रूप पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले असून, “आमच्या मुलीचा तातडीने शोध लावा” अशी मागणी त्यांनी केली आहे. आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पत्रकारांशी बोलताना नातेवाईकांनी सांगितले की, मुलगी बेपत्ता झाल्यापासून अनेक वेळा पोलिसांशी संपर्क साधूनही ठोस माहिती मिळत नसल्याने आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. “पोलीस प्रशासनाने तत्काळ शोधमोहीम राबवून आमच्या मुलीचा शोध लावावा,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

0 Comments