Advertisement

Breaking News
Loading...

मनगोळी शिवारात शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; उसाला पाणी देताना काळाचा घाला...


 मनगोळी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी शिवारात उसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतमजुराचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मंद्रूप पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक 34/2026 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 194 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. मयत व्यक्तीचे नाव राहुल उर्फ रावसो पर्सप्पा गायकवाड (वय 65, रा. मनगोळी ता. दक्षिण सोलापूर) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गायकवाड हे सुभाष उद्धवराव भोपळे यांच्या मौजे मनगोळी शिवारातील गट क्रमांक 98/ब मधील शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी बोअरवेलच्या कनेक्शनच्या सर्व्हिस वायरला विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती त्यांच्या पत्नी चांदाबाई राहुल उर्फ रावसो गायकवाड (वय 59) यांनी मंद्रूप पोलिसांना दिली. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

शेतात उघड्यावर असलेल्या विद्युत तारांमुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असून, वीज वितरण विभागाने सुरक्षा उपाययोजना अधिक कडक कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.



Post a Comment

0 Comments