Advertisement

Breaking News
Loading...

विजयपूर हादरलं! गोविंदपूरमध्ये सहा जणांची निर्घृण हत्या; परिसरात भीतीचं सावट...

 


विजयपूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी यशराज रगटे | विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात सहा जणांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एकाच गावातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चडचण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.

या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

चंदू निराळे

दुंडप्पा निराळे

शिवपुत्र निराळे

राहुल निराळे

समर्थ निराळे

शब्बीर अत्तार 

हे सर्वजण गोविंदपूर गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, एकाच वेळी सहा जणांची हत्या झाल्याने विजयपूर जिल्ह्यासह सीमाभागातही मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. पोलीसांकडून संशयितांचा शोध सुरू असून अधिक तपशील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.




Post a Comment

0 Comments