Advertisement

Breaking News
Loading...

काँग्रेसची सत्ता येणार: जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष हसापुरे


अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या (CWC) विशेष निमंत्रित सदस्य पदी निवड झाल्या बद्दल सोलापुर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या हस्ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नूतन (CWC) सदस्य आ.प्रणिती शिंदे यांचा जनवात्सल्य कार्यालय सोलापुर येथे सत्कार करण्यात आला.


सुरेश हसापुरे म्हणाले,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा,काँग्रेस पक्ष संघटनेबाबत महत्वपूर्ण निर्णय घेणारी कमिटी, लहान वयात आपल्या कर्तुत्वाने एवढ्या मोठ्या पदावर आमदार प्रणिती शिंदे  पोहोचल्या. भारत जोड़ो यात्रेत राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून देशभरात फिरल्या. काँग्रेस पक्षावर निष्ठा ठेऊन सुशीलकुमार शिंदे यांच्या नंतर काँग्रेस पक्ष संघटनेत मोट्ठी झेप घेतली आहे. येणाऱ्या काळात देशात आणि राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता नक्की येईल त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहु.

यावेळी होटगी स्टेशन उपसरपंच सुभाष पाटोळे, गुंजेगाव सोसायटी चेअरमन संतोष पवार, कुरघोट सरपंच बनसिद्ध बन्ने, आचेगाव सोसायटी चेअरमन जयशंकर पाटील, संगदरीचे उपसरपंच पद्मसिंह पाटिल, संगदरी ग्रामपंचायत सदस्य अर्जून घंटे, प्रकाश कारभारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments