Advertisement

Breaking News
Loading...

कुंभारी विडी घरकुल येथे हातभट्टी दारु बाळगलेल्या महिलेवर वळसंग पोलीसात गुन्हा दाखल

महिला पोलीस अंमलदार अंबिका माशाळे यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी विडी घरकुल परिसरात नीला प्रभु कोशेट्टी (वय वर्षे 48),राहणार ब विभाग विडी घरकुल,कुंभारी,ता.दक्षिण सोलापूर ही महिला राहत्या घराजवळील पत्राशेडच्या आडोशाला हातभट्टी दारू बाळगलेल्या स्थितीत मिळून आली.तिच्या ताब्यातून 600 रुपये किंमतीचे पाच पाच लिटरचे 3 प्लास्टीक कॅन्ड त्यामध्ये एकुण 15 लिटर हातभट्टी दारु जप्त करुन नष्ट करण्यात आली.म्हणुन सदर महिले विरुद्ध मुंबई प्रोव्हि अॅक्ट 65 ई प्रमाणे वळसंग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस नाईक राठोड हे करीत असल्याची माहीती शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.
दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments