Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने महानगरपालिकेवर हलगीनाद जनआक्रोश मोर्चा, दक्षिण विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश जोकारे यांचा पुढाकार




अखिल भारतीय काँग्रेस कमिटी वर्किंग कमिटीच्या विशेष निमंत्रित सदस्य आमदार प्रणिती शिंदे,महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत उपाध्यक्ष शिवराज मोरे,प्रदेश सरचिटणीस दीपक राठोड,सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने नागरि समस्या सोडविण्यासाठी अपयशी ठरलेल्या भाजप सरकार आणि सोलापुर महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात चार पुतळा येथून सोलापूर महापालिकेवर हलगीनाद जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.यावेळी दक्षिण विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश जोकारे यांनी पुढाकार घेत दक्षिण तालुक्यातून हजारो कार्यकर्त्यांसह या मोर्चामध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.

यावेळी सोलापूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष संयोजक गणेश डोंगरे,मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे वाहिद बिजापुरे,उत्तर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश लोंढे,दक्षिण विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश जोकारे,प्रवक्ते अशोक निंबर्गी,महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे,प्रदेश सरचिटणीस श्रीकांत वाडेकर,युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अनंत म्हेत्रे,प्रवीण जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments