Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

अकोले- मंद्रूप येथे शौचालय बांधण्याच्या वादातून दोघांना दगडाने झाली मारहाण, उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल

दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रूप येथे शौचालय बांधण्याच्या वादातून राजकन्या जनार्दन माने (वय वर्ष 23),जनार्दन नागनाथ माने (वय वर्षे 47),दोघेही राहणार अकोले मंद्रूप,तालुका दक्षिण सोलापूर यांना दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर भास्कर पाटील,कमलाकर पाटील या दोघांनी मिळून दगडाने मारहाण केली.त्या मारहाणीत राजकन्या माने यांना पोटावर जखम,डाव्या पायाला मुकामार लागला आहे.तर जनार्दन माने यांच्या डाव्या गुडघ्यास मुक्कामार लागल्याने त्यांना उपचारासाठी मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून रेफरने पुढील उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोघेही स्वतःहून दाखल झाले.दोन्ही रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments