Advertisement

Breaking News
Loading...

हत्तूर येथे सिमेंटच्या पिलरला बांधलेल्या दोरीला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, सिव्हिल पोलीसात घटनेची नोंद


दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे सागर नागनाथ हिरकूर (वय वर्षे २७),राहणार हत्तूर,ता.द.सोलापूर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.सागर याने सोमवार,दि.28 आँगस्ट रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घराच्या गच्चीवर असलेल्या सिमेंटच्या पिलरला बांधलेल्या दोरीला गळफास घेतल्याची बाब उघडकीस आल्यानंतर त्याला बेशुध्दावस्थेत उपचारासाठी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार म्हेत्रे यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दाखल केले.परंतु,त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.सदर घटनेची नोंद सिव्हिल हाॅस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....


Post a Comment

0 Comments