Advertisement

Breaking News
Loading...

कंदलगाव येथे पाणी भरताना विजेच्या धक्का बसून २३ वर्षीय महिलेचा मृत्यू, सिव्हिल पोलीसात घटनेची नोंद



दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे ईलेक्ट्रिक मोटारीने राहत्या घरी पाणी भरून झाल्यानंतर इलेक्ट्रिक बोर्डावरील पिन काढताना विजेचा धक्का लागून आरती मारुती शिंदे (वय वर्षे २३,रा.कंदलगाव,ता.द.सोलापूर) या महिलेचा मृत्यू झाला.सोमवारी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.आरती ही कंदलगाव येथे आपल्या राहत्या घरी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाणी भरत होती.पाणी भरून झाल्यानंतर ती इलेक्ट्रिक बोर्डावरील पिन काढताना तिला विजेचा धक्का लागला.हात ओला व आजूबाजूला पाणी असल्याने तिला काही कळण्याच्या अगोदरच झटका बसल्यामुळे ती बेशुद्ध पडली.महिलेचा दीर अक्षय शिंदे यांनी तिला सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आणल्यानंतर डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.या घटनेची नोंद सिव्हिल हाॅस्यिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments