Advertisement

Breaking News
Loading...

वडगाव येथे शेतातून ट्रक नेऊ नका असे म्हटल्याने दोघांना मारहाण करून जीवे मारण्याची दिली धमकी, वळसंग पोलिसात गुन्हा दाखल

सुनील महादेव लोहार (वय वर्षे 20),राहणार वडगाव तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक २९ आँगस्ट २०२३ रोजी. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणा फिर्यादीचे वडील दोघेही सुनिल दागडे यांच्या शेतात काम करीत होते.शेताच्या वरील बाजुस इराण्णा मल्लिनाथ यमदे,मल्लिनाथ शिवप्पा यमदे यांची शेती असुन ते त्यांच्या शेतातील माती विटभट्टी लोकांना विकतात.शेतातील माती भरून फिर्यादीच्या मालकाच्या शेतामधुन ट्रक घेवुन जावु नका असे म्हटल्यावर त्यांनी फिर्यादीला अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन धमकी देवु लागला.तेथे फिर्यादीचे वडील मल्लिनाथ शिवप्पा यमदे

यांना व त्याचा मुलगा इराण्णा मल्लिनाथ यमदे यांना समजावुन सांगताना फिर्यादीच्या वडीलाना शिवीगाळ करून हाताने लाथाने मारहाण केली तेव्हा फिर्यादीने मल्लिनाथ यमदे व त्यांचा मुलगा इरण्णा यमदे या दोघांना माझ्या वडिलांना मारू नका असे म्हटल्यावर फिर्यादीला विटाच्या तुकडयाने फिर्यादीच्या डोक्यावर व नाकावर मारून जखमी केले.तसेच मल्लिनाथ यमदे याने फिर्यादीच्या वडीलाला शिवीगाळ दमदाटी करून जिवेठार मारण्याची धमकी देवुन

निघुन गेले.म्हणुन दोन्ही आरोपीविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण हे करीत असल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments