Advertisement

Breaking News
Loading...

भवानी पेठ येथे जयभवानी प्रतिष्ठानच्या मार्कंडेय महामुनी मिरवणुकीस राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांच्या हस्ते पूजन करुन प्रारंभ

रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेनिमित्त सोलापूर शहरातील भवानी पेठ घोंगडे वस्ती येथील जयभवानी प्रतिष्ठानच्यावतीने मार्कंडेय महामुनींच्या मिरवणुकीचा प्रारंभ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महेश कोठे,माजी नगरसेवक सुरेश पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अक्षय वाकसे,राष्ट्रवादीचे शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष युवराज सरवदे यांच्या हस्ते मार्कंडेय महामुनींच्या प्रतिमेचे पूजन करुन प्रारंभ करण्यात आला.



यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे आणि माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले.


सदर प्रसंगी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे अक्षय अंजिखाने,सागर अतनुरे,महाकाल प्रतिष्ठानचे लोकेश इरकशेट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती.सदर मिरवणूकीसाठी प्रतिष्ठानचे संस्थापक संदीप महाले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे.



  सोलापूर  प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments