Advertisement

Breaking News
Loading...

शौचालयातील भांड्यात अडकला साप

बाळे येथील ज.रा.चंडक प्रशाला येथील स्वच्छतागृहामध्ये एक साप असल्याची माहिती प्रशालेतील कर्मचारी सुनील चांगभले व दशरथ गुरव यांनी वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशनच्या सदस्यांना कळविले.तात्काळ सदस्यांनी सदर ठिकाणी धाव घेऊन स्वच्छतागृहामधील शौचालयाच्या भांड्यात असलेल्या फटीत एक धामण जातीचा बिनविषारी साप विचित्ररित्या अडकल्याचे त्यांना दिसून आले.वाईल्डलाईफ काँझर्वेशनच्या सदस्यांनी सुरुवातीला त्या स्वच्छतागृहामध्ये असलेल्या भांड्यात पाणी भरून साप त्या फटीतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न केले.तरीपण तो साप बाहेर आला नाही.काही वेळ बाहेर येण्याची वाट पाहिली.काही वेळानंतर धामण सापाने आपले डोके वर काढले.तदनंतर संतोष धाकपाडे यांनी हॅन्डग्लोज घालुन सुरक्षितरित्या त्या धामण सापाला बाहेर काढून त्याला जीवदान दिले.या बचाव कार्यामध्ये संतोष धाकपाडे,सुरेश क्षीरसागर,लखन भोगे,प्रवीण गावडे,रोहित गावडे,सौरभ पसारे तसेच शाळेतील सुनील चांगभले व सेवक राठोड यांनी सहभाग घेतला.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....


Post a Comment

0 Comments