Advertisement

Breaking News
Loading...

कुरघोट येथे शेतीच्या वादातून महिलेस तिघांनी केली दगड आणि लाकडांनी मारहाण


दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरघोट येथे मंजुळा गोविंद कांबळे (वय वर्ष 45),राहणार कुरघोट,तालुका दक्षिण सोलापूर या महिलेस दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शेतीच्या वादातून ईरप्पा लक्ष्मण कांबळे,शिवानंद ईरप्पा कांबळे आणि इतर १ जणांनी मिळून दगड आणि लाकडाने जबर मारहाण केली.या मारहाणीत मंजुळा कांबळे यांच्या सर्वांगास मुकामार लागल्याने त्यांना मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून रेफरने सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता स्वतःहून दाखल झाल्या.रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments