Advertisement

Breaking News
Loading...

दक्षिण सोलापूर बहुजन पत्रकार युनियनच्या निवडी जाहीर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे झालेल्या बैठकीत बहुजन पत्रकार युनियनच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी बनसिध्द देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली.तसेच सचिवपदी अप्पु देशमुख,सहसचिव पदी गुरु गायकवाड,कार्याध्यक्ष पदी नारायण घंटे,खजिनदारपदी अभिजित जवळकोटे यांची निवड करण्यात आली.


यावेळी नूतन अध्यक्ष मल्लिकार्जुन कांबळे व उपाध्यक्ष बनसिध्द देशमुख आणि आरपीआयचे जिल्हा संपर्क प्रमुख सतीश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले.


याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख सतिश शिंदे,दक्षिण सोलापूर कांग्रेसचे युवा नेते जितेंद्र गावडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मशाप्पा कोळी,युवक काँग्रेसचे नेते तुळशीराम भाऊ राठोड,सामाजिक कार्यकर्ते तौशिफ शेख,उमेश गायकवाड,अमित दुलंगे आदी मान्यवर उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख सतिश शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार कांग्रेसचे युवा नेते जितेंद्र भाऊ गावडे यांनी मानले.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments