Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

औज येथे जिल्हा परिषद शाळेसमोर सिमेंटचा बल्कर पलटी होऊन चार-पाच विद्यार्थी चेंगरल्याचा अंदाज



दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिमेंट फॅक्टरीतून सिमेंट घेऊन सोलापूरच्या दिशेने येणारा सिमेंटचा बल्कर नेमका औज येथील जिल्हा परिषद शाळेसमोर पलटी झाला.काहीवेळापूर्वीच हा अपघात झाला असून त्या सिमेंट बल्करखाली चार-पाच चिमुकली चेंगरल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.


दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिमेंट फॅक्टरीतून सिमेंट

घेऊन सोलापूरच्या दिशेने येणारा सिमेंटचा बल्कर औज (आ) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर पलटी झाला.काहीवेळापूर्वीच हा अपघात झाला असून त्या सिमेंट बल्करखाली चार-पाच चिमुकली चेंगरल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.वळसंग पोलिसांची शोध मोहीम सुरु असून आतापर्यंत बल्करखाली चेंगरलेली एक चिमुकली पोलिसांना सापडली आहे.वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले हे स्वतः त्याठिकाणी उपस्थित आहेत.सिमेंट बल्कर चालक तेथून पसार झाल्याचीही माहिती पुढे येत आहे.ग्रामस्थांनी त्याठिकाणी मोठी गर्दी केली असून ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांकडून सिमेंट बल्कर उचलण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.काहीवेळापूर्वीच हा भयानक अपघात झाला असून टायर पंक्चर झाल्याने की अन्य कोणत्या कारणास्तव सिमेंट बल्कर पलटी झाला याचा तपास पोलिसांकडून होणार आहे.

 दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments