दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज आहेरवाडी येथील नवीन माध्यमिक हायस्कुल येथे पंचायत समिती दक्षिण सोलापूर यांच्या वतीने आयोजित १४ वर्षे वयोगटातील तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये गुंजेगाव येथील श्री सिद्धिविनायक विद्यामंदिर प्रशालेने घवघवीत यश मिळवले.
या स्पर्धेतील अंतिम चुरशीचा सामना मंद्रूप माध्यमिक प्रशाला,मंद्रूप आणि श्री सिद्धिविनायक विद्या मंदिर,गुंजेगाव या शाळे सोबत झाला.श्री सिद्धिविनायक विद्या मंदिर गुंजेगाव या शाळेने 9 गुणाने विजय प्राप्त केले.या खेळाडूंची जिल्हास्तरीय सामन्यांसाठी निवड झाली.
या सामन्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक शशिकांत उपासे,क्रीडा शिक्षक शिरीषकुमार गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.
संदेश भडकुंबे,रितेश थिटे,नैतिक कांबळे,समर्थ कोळी,समर्थ पाटील,सोहम पाटील,ओम कोळी,गणेश शिरसागर,आर्यन भडकुंबे,यश कोळी आदी खेळाडूंनी यात सहभाग नोंदवला.
दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....
0 Comments