Advertisement

Breaking News
Loading...

मुस्लिम बांधवानी केले पावसासाठी विशेष नमाजाचे पठन

 राज्यातील अनेक भागात पावसाने दडी मारली आहे.त्यामुळे राज्यातील अनेक भागात सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.सोलापुरात देखील सध्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे मुस्लिम बांधवातर्फे आज रविवारी विशेष नमाजाचे पठन करण्यात आले.अहले हदिस संघटनेतर्फे सोलापुरातील रंगभवन ईदगाह मैदानावर पावसासाठी विशेष नमाजचे आयोजन करण्यात आले.यामध्ये अनेक मुस्लिम बांधवानी उपस्थित राहून पावसासाठी प्रार्थना केली.या नमाजला 'नमाजे इस्तेस्का' असं म्हटलं जातं.जेव्हा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते,त्यावेळी खुल्या मैदानात एकत्रित येऊन ही नमाज अदा केली जाते. 


याबाबत अहले हदिस संघटनेचे सचिव मौलाना ताहेर बेग मोहम्मदी यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments