Advertisement

Breaking News
Loading...

शेखर बंगाळे यांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, मंद्रूप पोलीसांना निवेदन

क्रांतिवीर किसान सेनेचे प्रदेशाध्यक्ष शेखर बंगाळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देताना त्यांच्यावर भंडाऱ्याची उधळण करून निषेध व्यक्त केला.यावेळी तेथे उपस्थित असलेले भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि इतर सुरक्षारक्षकांनी शेखर बंगाळे यांना मारहाण केली.या मारहाणीची चौकशी करुन मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत,अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिवानंद झळके यांनी मंद्रूप पोलिसांना दिले आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments