Advertisement

Breaking News
Loading...

सोहाळे येथील शेतशिवारामध्ये आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह


दिनांक 14 सप्टेबर 2023 रोजी मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथील शेतशिवारामध्ये एक अनोळखी पुरुषाचा प्रेत (वय अंदाजे 55 ते 60 वर्ष) सडलेल्या स्थितीमध्ये मिळून आले आहे.त्याच्या अंंगावर निळ्या पांढऱ्या लाइनिंगचा फुल भायाचा शर्ट,पांढरे बनियन,करड्या रंगाची अमोल मॅचो कंपनीची अंडरवेअर,काळ्या रंगाची फुल पॅन्ट असून बांधा सडपातळ,डोक्यावर पांढरे केस,पांढरी बारीक दाढी असलेल्या या अनोळखी इसमाची कामती पोलीस ठाणे येथे चौकशी सुरू असून सदर अनोळखी इसमाचे नातेवाईक अथवा त्याचे नाव आणि पत्त्याबाबत काही माहिती असल्यास कामती पोलीस ठाणे येथे संपर्क साधण्याचे आवाहन पीएसआय एस.पी.गोदे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments