Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मोटार सायकल चोरी करणार्‍या ३ आरोपींना मंद्रूप पोलीसांकडून अटक

दिनांक २२ आँगस्ट २०२३ रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलचे मालक कलप्पा सोमनिंग देवकते (रा.राजुर,ता.द.सोलापूर) यांची मोटारसायकल त्याचा क्रमांक MH 13 AP 9981 हि औराद रोडवरून अज्ञात आरोपींनी चोरून नेली म्हणून मंद्रुप पोलीसात फिर्याद दिली होती.त्यानंतर मंद्रुप पोलीस ठाणे हद्दितील राजूर गावातून फिर्यादीच्या घरासमोरून एक फॅशन प्रो हिरो कंपनीची मोटार सायकल तिचा क्रमांक MH 13 BK 4481 तसेच औराद गावातून फिर्यादीच्या घरासमोरून एक फॅशन प्लस हिरो कंपनीची मोटार सायकल तिचा क्र.MH 14 BU0726 हे अज्ञात चोरटयांनी चोरून नेले होते.असे एकुण तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते.


मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतून वारंवार मोटार सायकल चोरीच्या गुन्हयाचे प्रमाण वाढल्याने त्याचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी मंद्रूप पोलीसांना सदर मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना देवून आदेशित केले होते.


या अनुषंगाने मोटारसायकल चोरांचा मंद्रूप पोलीस शोध घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या बातमीनुसार,औराद व राजूर येथील मोटार सायकली औराद येथील लखन कोळी याने चोरले असल्याचे समजले.त्याचा लागलीच औराद गावात व शिवारात शोध घेवून त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडे चोरीस गेलेल्या मोटार सायकलीच्या अनुषंगाने तपास केला असता त्याचे साथीदार मंजू गोपीनाथ बंडगर व कासीम बाशालाल शेख दोघे रा.औराद,ता.द.सोलापूर यांच्या मदतीने मोटारसायकली

चोरल्याचे सांगितले.त्यावरून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांनी लखन कोळी त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेवून ताब्यात त्यांच्याकडे तपास केला असता तपासात इतर दोन मोटार सायकली १ )लखन शिवपुत्र कोळी २) कासीम बाशालाल शेख ३) एक विधी संघर्ष बालक यांनी सर्वजण रा.औराद,ता.द.सोलापूर यांनी चोरून सदरच्या तीन्ही मोटार सायकली या लखन शिवपुत्र कोळी याने त्याच्या शेतातील वस्तीवर ठेवले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.५५ हजार रुपये किंमतीच्या एकुण ३ मोटार सायकली पंचनाम्या दरम्यान हस्तगत केल्या असून एकुण ३ आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.अधिक तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.


सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव,उपविभागीय पोंलीस अधिकारी अमोल भारती,सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमितकुमार करपे,सपोफौ संदीप काशीद,पोलीस हवालदार अविनाश पाटील आणि पोलीस अंमलदार संदीप काळे,दिनेश पवार,महांतेश मुळजे,माजीद शेख,सागर चव्हाण यांनी पार पाडली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments